Wednesday, October 31, 2012

आज माझ्या वेदनेला
||
आज माझ्या वेदनेला
लागली कुणाचीतरी नजर!
कारण आज फुटलाय,
तिच्या कठोर हृदयाला पाझर

आज माझ्या वेदनेला
लागली सुखाची चाहूल,
जेव्हा मला तिने  दिला
नजरेने प्रेमाचा  कौल

आज माझ्या वेदनेला
पडतात  तिचीच स्वप्ने
तिच्याच प्रेमात हरपून,
तिचीच आठवण जपणे

आज माझ्या वेदनेला
झालाय अनावर हर्ष
जसा झाला तिचा,
अलगद कोमल स्पर्श

आज माझ्या वेदनेला
माझ्या आयुष्यातून जावेलागले..
मनमाझे  तिच्या सोबत
तुला बघताच! बैमान वागले...
||
अर्पित

Friday, October 19, 2012

||

दोन साधू जीवांची
झाली गळाभेट
आरास प्रेमदिव्यांची
नामध्ये

एकाच मुखी
खाता घास
सर्वेच सुखासुखी
होतेतेंव्हा

काळ लोटला
झाली नाती जुनाट
आज नवीन खटला
जीवनात

वाजता तोंडे
झाले मन कटू
आता सारेच वेडे
एकामेकी

दूरचे डोंगरी
साजरा दिसता
म्हनुन बघावा घरी
बसुनिया

||

अर्पित

Saturday, October 13, 2012

लावणी


लावणी
||
पौर्णिमेच्या चंद्राच पाण्यात बिंब
चांदणी भिजलिया चंद्राच्या प्रेमात चिंब
ह्या मेनकेला आज प्रेमान तुम्ही शिवाल का?
आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)

ज्वानीच्या नावेत टाकल मी पाऊल
तुमच्या पिरतीची राया झाली मला चाहूल
राया मला ज्वानीच्या बोटेतून मिरवाल का?
आज रातीला  तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)

आज नशिबान रूपावर किमया केली
चंद्राच्या चांदण्यात चांदन न्हाली
ह्या रेशमी केसातून हात तुम्ही फिरवल का?
आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)

मदनाचा शिणगार करून मी बसले
राया तुमच विचार करीत खुदकन हसले
प्रेमान गजरा माझ्या केसात माळाल का?
आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)
||
अर्पित


Tuesday, June 26, 2012

रांगोळी

नवीं कोरे रंग दुकानातून आणले
आणता आणता रंग आपापसात भांडले
सोडून पुड्या डब्यात  भरल्या
भारता भारता थोड्या थोड्या सरल्या
पंढरी रांगोळी  पायलीभर घेतली
रांगोळीची हौस म्हणून खिश्यांवर बेतली
ठिपके जोडून रांगोळी आखली
रंग भरताना मात्र कंबर वाकली
काही रंग मनातही भरले
भरताना मन रंगातच हरले
सुरेख रांगोळी अंगणात काढली
नक्षत्र नाव चिन्हे तुळशी समोर फाडली
माझ्या रांगोळीचा एकाच हेतू
क्षणभर का होईना फक्त सुखच वाटू
अल्पायुशी माझी रांगोळी गुणी
हसून करते स्वागत होता होता जुनी 

कृष्णगंधा




Sunday, June 10, 2012

मुलीचे लग्न झाल्यावर आईची होणारी घालमेल

 आठवते सोनू माझी
 झोपी जाता जाता
 स्वप्नातही तीच होती
 पहाट होता होता

 सकाळच्या घाई मध्ये
 शोधात होते तिचेच गाणे

 दुपारच्या जेवणात सुद्धा
 घास घेते तिच्याच नावाने

 मध्यान्याचा शेवटी शेवटी
 विचार तिचाच करत असते

 अन तिच्याच आठवणीत
 वेळ माझी मात्र सरत असते

 अर्पित
तो पहा शाकुंतल पक्षी, असे म्हंटल्यावर ज्या प्रमाणे भरत राज्याला आपल्या आई ची आठवण यायची त्याचप्रमाणे माझ्या आईला शेवंतीचे फुल पाहिल्यावर तिला तिच्या आईची आठवण येते.
हि मानवंदना माझ्या आई कडून तिच्या आईला...

शेवंतीचे वृंदावन.........

शेवंतीचे फुल पाहता
आठवण झाली मायेची
टचकन डोळा पाणी साठे
तिच्या आठवणीत मन दाटे

आताही चहा करताना
तुझी आठवण येते
लाटन धरून शिकवलेली
पोळी आज गोल होते

तुझ्या नियम सूत्रांवर
माझा संसार फुलवत आहे
हाताने कष्ट, मुखाने स्पष्ट
मानाने मोकळे असे काही वागत आहे

शेवंतीचे फुल आता
माधावांसी वाहते
तुझ्या आठवणीत
कधी कधी डोळे माझे गाते

अर्पित





Wednesday, January 11, 2012

कल्पने परी

जैसे फुले कळी , वेलू वरती  
तैसा स्फुरे शब्द , कल्पने परी  
इंद्राचे हा सर्ग , दिवे न देखिला 
पण रचियेला मी, काल्पनि परी  
मावळत्या सूर्या , न पुसे धीर  
त्यासी साधिला संवादू , कल्पने परी 
सुवर्ण कमळू , न स्पर्शियेला 
पण दरवळे सुगंधु काल्पनि परी
दुःखाचे डोंगरु झले हो हलका 
खेचीली माती कल्पने परी  
बहरला आनंदू , जपिला क्षण 
गुंफिली माल, कल्पने परी  
दिधला स्वरूप ,ह्या मातीचे पुतळा 
शब्द शब्दांचो खेळ, कल्पने परी  
अर्पित