||
भाकर भाकर सुर्व्या सारिखा आकार
माझा धनीग कष्टाळू, त्याचे पोट प्रेमाने भर
भाकर भाकर तुझा चंद्रा सारिखा आकार
माझा बाळ ग हळवा, त्याचे स्वप्न तू साकार
भाकर भाकर तुझा धरतीचा ग आकार
माझी लेक गुणी तिची ओटी सुखाने तू भर
भाकर भाकर माझ्या कुंकवाचा ग आकार
रोज माझ्या घरी पाव, असे आमंत्रण स्वीकार
भाकर भाकर तुझा आकार ग गोल
मायेचा ग परीघ तुला उदर भरतीचा मोल
||
अर्पित
No comments:
Post a Comment